अंगणवाडीची कार्ये

भारतीय भाषांमध्ये अंगणवाडी शब्दाचा अर्थ “अंगणामधील निवारा” असा आहे. अंगणवाड्या भारत सरकारने १९७५ साली एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत चालू केल्या आणि त्याचा उद्देश बालकांमधील कुपोषणाशी लढणे हा होता.

महाराष्ट्र राज्यात १०८००५ अंगणवाड्या/ मिनी अंगणवाडी केंद्रे आहेत. राज्यात ५५० पेक्षा जास्त एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प चालू आहेत, ज्यामध्ये ४००० वर पर्यवेक्षक आणि अंदाजे २ लक्ष अंगणवाडी कर्मचारी/ मदतनीस आणि छोट्या अंगणवाडीमधील कर्मचारी कार्यरत आहेत आणि ते संपुर्ण आईसीडीएस प्रकल्प निम्नस्तरापासून चालवत आहेत.

आईसीडीएसअंतर्गत अंगणवाडी हे सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे. खालील तक्त्यामध्ये लाभार्थी आणि उपलब्ध सेवा यांची माहिती दिली आहे

अ.क्र. लाभार्थी उपलब्ध सेवा
गरोदर आणि उपचार चालू असलेल्या माता, किशोरवयीन ११ ते १८ वयोगटातील मुली.
  1. आरोग्य तपासणी
  2. गरोदरमहिलांचे धनुर्वातविरोधी लसीकरण
  3. संदर्भ सेवा
  4. पुरक पोषण आहार 
  5. पोषण आणि आरोग्य शिक्षण
अन्य महिला वयोगट १५ ते ४५ वर्षे
  1. पोषण आणि आरोग्य शिक्षण
१ वर्ष वयाखालील बालके
  1. पुरक पोषण आहार 
  2. लसीकरण
  3. आरोग्य तपासणी
  4. संदर्भ सेवा
१ ते ३ वयोगटातील बालके
  1. पुरक पोषण आहार
  2. लसीकरण
  3. आरोग्य तपासणी
  4. संदर्भ सेवा
३ ते ६ वयोगटातील बालके
  1. पुरक पोषण आहार 
  2. लसीकरण
  3. आरोग्य तपासणी
  4. संदर्भ सेवा
  5. अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण