ऑनलाइन देणगी

कुपोषणाविरूद्धचा लढा मजबूत करण्यासाठी आणि पुनर्वसन घरे आणि इतर उपक्रमांची स्थापना करण्यासाठी योगदान द्या. 

विविध धोरणे आणि कार्यक्रमांद्वारे महिला व बालकांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी हे विभाग कार्यरत आहे. ज्यामध्ये नागरिकांमध्ये जन जागृती निर्माण करणे, लिंगविषयक बाबीं हे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, गरजू महिला आणि बालकांना पूर्ण क्षमतेने विकसित करण्यासाठी संस्थात्मक आणि कायदेशीर सहाय्य प्रदान करणे हे समाविष्ट आहे.

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन विविध धोरणांद्वारे महिला व बालकांचे शाश्वत सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी भागीदारीचे महत्त्व आणि कॉर्पोरेट्स / व्यक्तींचे महत्त्व जाणते आणि अशा कार्यक्रमांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR)ही महत्वाची भूमिका बजावते. 

महाराष्ट्र शासन राज्यातील महिला आणि बालकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या योगदानासाठी व्यक्तीगत आणि कॉर्पोरेट्स कंपन्यांना या दृष्टीचा एक भाग होण्यासाठी आमंत्रित करत आहे.