महाराष्ट्र राज्यातील ६ वर्षांखालील बालकांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करणे हे आयसीडीएस आयुक्तालयाचे दायित्व आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शाला-पूर्व शिक्षण यांची संकलित सेवा पुरवू इच्छिते. लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच हा उपक्रम किशोरावस्थेतील मुली, गरोदर महिला तसेच स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालयाची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
आयसीडीएसच्या सुविधा आयसीडीएसच्या केंद्रांच्या मार्फत पुरविण्यात येतात, ज्यास “अंगणवाडी” म्हणून ओळखले जाते. लहान मुलांची चांगली देखभाल आणि विकासाचे केंद्र, जे कमीत कमी खर्चात स्थानिकपातळीवरील उपलब्ध साधन सामुग्रीतून अगदी अंगणातच चालविता येते अशी अंगणवाडीची संकल्पना आहे. अंगणवाडी केंद्र हे “अंगणवाडी कर्मचारी” (AWW) आणि “अंगणवाडी सहायिका” (AWH) चालवितात. स्थानिक पातळीवरील अंगणवाडी केंद्र हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा प्रमुख आधारभूत उपक्रम आहे.
आयसीडीएस आयुक्तालयाबाबत अधिक माहितीकरिता पुढील संकेतस्थळाला भेट द्या http://icds.gov.in/ External Link:This will open in new window.