योजना

Name of the Scheme Brief Details of the Scheme
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आय सी डी एस)
  • आय सी डी एस, हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या उपक्रमापैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात येतो.
  • आय सी डी एस लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शालापूर्व शिक्षण सेवा संकलित स्वरुपात  पुरवू इच्छिते.
  • लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच या उपक्रमाची व्याप्ती किशोरावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आली आहे.
  • आय सी डी एस उपक्रम मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात किंवा वार्डात सर्व पायाभूत आवश्यक सेवा एकत्रितपणे पुरवू इच्छिते. ही योजना शहरी झोपडपट्ट्यामधून आणि ग्रामीण तसेच आदिवासी विभागातून टप्याटप्याने विस्तारली आहे.
  • राज्यात आय सी डी एस उपक्रमाचे एकूण ५५३ प्रकल्प कार्यरत असून ३६४ ग्रामीण, ८५ आदिवासी विभागात आणि १०४ शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आहेत.
  • या योजनेतंर्गत लाभार्थींना पुरविण्यात येणाऱ्या काही प्रमुख सेवा:
    • पुरक पोषण आहार
    • लसीकरण
    • आरोग्य तपासणी
    • संदर्भ आरोग्य सेवा
    • अनौपचारीक शाला-पूर्व शिक्षण
    • पोषण आणि आरोग्य शिक्षण
काम करणार्‍या महिलांच्या मुलांकरीता राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना
  • या उपक्रमातंर्गत शाला-पूर्व मुलांना आवश्यक ती प्रबोधनपर खेळणी आणि शैक्षणिक साहित्य पुरविले जाते
  • या घटकांना लक्षात घेऊन आणि भारत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून महाराष्ट्र शासनाने देखील प्रायोगिक तत्वावर ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ६०० पाळणाघरे सुरु केली आहेत.

डाउनलोड

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
  • या योजनेचे मूळ उद्दिष्ट गर्भवती आणि स्तनपान कालावधीत महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे तसेच त्यांना पोषक आहार उपलब्ध करून त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारणे.
  • गर्भवती महिलेने नोंदणी केल्यानंतर तिला शासनातर्फे मिळणारे आर्थिक लाभ घेता येतात. शासनाकडून दोन हप्त्यांमध्ये एकूण रुपये ६००० मदत दिली जाते.  प्रथम प्रसुतीच्यावेळी (रुपये ३०००) आणि बालक सहा महिन्यांचे झाल्यावर (रुपये ३०००) देण्यात येतात.
  • सद्यस्थितीत ही योजना अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित आहे.

Download

किशोरी शक्ति योजना

या योजनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:

  • किशोर वयातील मुलींना बालविवाहाचे आणि वारंवारं मुलांना जन्म देण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तसेच संतुलित आहाराची आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याची आवश्यकता इत्यादी बाबतचे आरोग्य आणि स्वच्छते संबंधीत शिक्षण तसेच प्रशिक्षण देणे.
  • या योजनेतंर्गत किशोरींकरिता ’किशोरी मेळावा’, ’किशोरी आरोग्य शिबीर’ असे विविध प्रकारचे कार्यक्रम अंगणवाडी केंद्र पातळीवर  आयोजित केले जातात. ज्या किशोरींना रक्तक्षय झाला असेल अशा मुलींची आर्यन फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देऊन विशेष काळजी घेतली जाते तसेच त्यांना स्वस्वच्छते विषयी विशेष प्रशिक्षण दिले जाते.
  • सद्यस्थितीत ही योजना  अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदूर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये (केवळ २३) सुरू आहे.

Download

किशोरवयीन मुलींसाठी योजना

या योजनेची अतिमहत्वाकांक्षी उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:

  • किशोर वयातील मुलींना स्वयं-विकास आणि सबलीकरणाकरिता सक्षम करणे
  • त्यांच्या पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारणे.
  • त्यांच्यामध्ये आरोग्य, स्वच्छता, पोषण, पौगंडावस्थेतील प्रजनन आणि लैंगिक आरोग्य (ए आर एस एच), कुंटुंब आणि मुलांची काळजी याबाबत जाणीव जागृती करणे.
  • ही योजना ११ ते १४ वर्षे  वयोगटातील किशोरवयीन मुलीं जे शाळेत जात नाहीत त्यांच्यासाठी लागू आहे
  • त्यांच्या गृह कौशल्ये, जीवन कौशल्ये आणि व्यावसायिक कौशल्यांमध्ये सुधारणा करा.
  • शालाबाह्य किशोरावस्थेतील मुलींना औपचारीक/ अनौपचारीक शिक्षण देऊन मुख्यप्रवाहात आणणे.
  • त्यांना सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, सामाजिक आरोग्य केंद्र, टपाल कार्यालय, बॅंक, पोलीस ठाणे इत्यादी सार्वजनिक सेवांबाबत माहिती देणे आणि मार्गदर्शन करणे.
  • सध्या, राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू आहे

डाउनलोडPDF File2.67 MB