महिलांकरीता कार्ये

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन महिलांचे जीवन, सुरक्षा, विकास आणि त्यांचा एकूण सहभाग सुनिश्चित करण्याकरिता समग्रपणे केंद्रित राहून महिला विकासासाठी प्रयत्न करते. विभागाची महिला विकास कार्यातील काही महत्वपूर्ण उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत (परंतु केवळ या उद्दिष्टांपुरतेच ते मर्यादित नाही):

  • पिडीत, निराधार आणि वंचित महिलांच्या पुनर्वसनात सहाय्य करणे
  • कौटुंबिक आणि सामाजिक हिंसेला बळी पडलेल्या महिलांना संरक्षण देणे
  • महिलांना हानिकारक ठरणाऱ्या महिला विरोधी समाज रुढींचा बिमोड करणे
  • महिलांना रोजगार मिळविता येईल अशी कौशल्य आणि क्षमता प्रदान करणे.
  • हा उपक्रम अधिक निकोप, जास्त कमावित्या आणि घरात स्वत:च्या निर्णयक्षमतेचा उपयोग करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांची शक्ती निर्माण करण्याच्या दिशेने कार्यरत आहे. महिलांच्या कौशल्याचा विकास करून  क्षमता संवर्धन करणे आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यास त्यांना प्रोत्साहन देणे
  • बालकांमधील लिंग गुणोत्तर वृध्दीगंत करण्यासाठी योजना आणि धोरणांची अमंलबजावणी करणे