बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना

  • ज्यातील  बालक लिंग गुणोत्तर वृध्दीगंत करण्याच्या प्रमुख उद्देशाने राज्याच्या महिला आणि बालकं विकास विभागाने केंद्र शासनाची बेटी बचाओ बेटी पढाओ योजना बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली आणि जालना या दहा जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केली आहे.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची अतिमहत्वाकांक्षी उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
    • पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंध करणे. (स्त्रीभृण हत्यांना प्रतिबंध करणे)
    • मुलींच्या जिवीताची आणि संरक्षणाची खातरजमा करणे
    • मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करणे
  • दि.१५ जून २०१६ पासून हिंगोली,सोलापूर, पुणे , परभणी , नाशिक, लातूर या अतिरिक्त जिल्हयांचा समावेश सदर योजनेत करण्यात आला आहे
  • शासन निर्णय दि. ६ ऑगस्ट ,२०१८ नुसार उर्वरित १९ जिल्हयात  सदर योजना  करण्यात आली आहे
  • देशात महाराष्ट्र हे असे राज्य आहे कि , त्यामधील जळगाव आणि उस्मानाबाद जिल्हयांना प्रभावी समुदाय प्रतिबद्धता ,प्रसूती पूर्व  लिंग निदान परिरक्षण ,पूर्वसंकल्पनेची अंमलबजावणी ,तसेच मुलींना बाळ शिक्षणात सक्षम बनविणे  या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यबद्दल  विशेष पुरस्काराने माननीय मंत्री महिला व  बाळ विकास मंत्रालय  (भारत सरकार)  यांच्या  हस्ते दि. २४ जानेवारी ,२०१७ रोजी ,राष्ट्रीय बालिका दिवशी सन्मानित करण्यात आले आहे

डाउनलोडPDF File3.13 MB

More Schemes