माझी कन्या भाग्यश्री योजना

 • दिनांक ८ मार्च २०१५ रोजी महिला आणि बालक विकास विभागाने “माझी कन्या भाग्यश्री” या त्यांच्या पहिल्या वहील्या अनोख्या योजनेची उदघोषणा केली.
 • या उपक्रमातंर्गत मुलींच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी, बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी आणि कौशल्ये विकसनासाठी मुलींच्या कुंटुंबियांना आर्थिक प्रोत्साहन देण्यात येईल.
 • या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
  • मातांना पारितोषिक : मुलीच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी आणि योग्य पोषणासाठी मुलीच्या पालकांना नियमीतपणे आर्थिक लाभांश देण्यात येतात.
  • मुलीकरिता पारितोषिक : वयाच्या १८ व्या वर्षी, मुलीला कौशल्ये विकसनासाठी आणि उच्चशिक्षणासाठी रुपये १ लाख देण्यात येतील जेणे करून भविष्यात तिला रोजगार मिळाविता येईल आणि तिच्या निश्चित उत्पन्नाची सोय होईल, परंतु तो पर्यंत तिचा विवाह झालेला असता कामा नये.
  • आजीला पारितोषिक : बहुसंख्य कुंटुंबामध्ये घरातील सासूसासऱ्यांचा मुलगा जन्माला यावा असा आग्रह असतो. यावर तोडगा म्हणून मुलीच्या वडीलांच्या आईला सोन्याचे नाणे तसेच माननीय महिला आणि बालक विकास मंत्र्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.
  • गावाला पारितोषिक :  कोणत्याही गावात जेथे लिंग गुणोत्तर १००० पेक्षा अधिक असेल त्यांना माननीय महिला आणि बालक विकास मंत्र्यातर्फे ५,००.००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
  • या योजनेतंर्गत शासन दारीद्र्यरेषेवरील कुंटुंबातील मुलींना रुपये २१,२०० विमा संरक्षण पुरविण्यात येईल.

Download

More Schemes