आय सी डी एस, हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या उपक्रमापैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात येतो.
आय सी डी एस लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शालापूर्व शिक्षण सेवा संकलित स्वरुपात पुरवू इच्छिते.
लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच या उपक्रमाची व्याप्ती किशोरावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आली आहे.
आय सी डी एस उपक्रम मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात किंवा वार्डात सर्व पायाभूत आवश्यक सेवा एकत्रितपणे पुरवू इच्छिते. ही योजना शहरी झोपडपट्ट्यामधून आणि ग्रामीण तसेच आदिवासी विभागातून टप्याटप्याने विस्तारली आहे.
राज्यात आय सी डी एस उपक्रमाचे एकूण ५५३ प्रकल्प कार्यरत असून ३६४ ग्रामीण, ८५ आदिवासी विभागात आणि १०४ शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आहेत.
या योजनेतंर्गत लाभार्थींना पुरविण्यात येणाऱ्या काही प्रमुख सेवा: