गोपनीयता धोरण

सर्वसाधारण नियम म्हणजे तुम्ही या संकेतस्थळाला भेट दिल्यास ते तुमच्या बाबतची कोणतीही वैयक्तिक माहिती विचारीत नाही. तुमची ओळख उघड न करता तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊ शकता, मात्र तुम्ही स्वत: स्वत:ची माहिती देण्याची निवड करू शकता.

हे संकेतस्थळ तुमच्या भेटींची नोंद ठेवते आणि सांख्यिकी उद्देशाने खालील माहिती नोंदवून ठेवते- तुमच्या सर्व्हरचा ॲड्रेस, तुम्ही जेथून इंटरनेट सुविधेचा लाभ घेत आहात तेथील सर्वोच्च पातळीचा डोमेन (उदाहराणार्थ; .gov, .com, .in इ.); तुम्ही वापरत असलेल्या ब्राउजरचा प्रकार; तुम्ही संकेतस्थळाला भेट दिली ती दिनांक आणि वेळ; तुम्ही पाहिलेली पृष्ठे; तुम्ही डाउनलोड केलेले दस्त-ऐवज आणि यापुर्वी तुम्ही संकेतस्थळाला थेट भेट दिली ते इंटरनेट स्थळ (ॲड्रेस). आम्ही वापरकर्ते किंवा त्यांच्या ब्राउझिंग कृतीमध्ये लक्ष घालणार नाही, मात्र कायद्याची अंमलबजावणी करणारी कायदेशीर संस्थेला सेवा पुरविणाऱ्यांच्या नोंदीचा तपशील तपासावयाचा असल्यास ही माहिती प्रदान करावी लागेल.

कुकी म्हणजे एक छोटेसे सॉफ्टवेअर असते तुम्ही जेव्हा कोणत्याही संकेतस्थळाला भेट देता तेव्हा ते संकेतस्थळ तुमच्या ब्राउजर कडे पाठवते.  या संकेतस्थळावर असे कुकी सॉफ्टवेअर वापरलेले नाही.

तुम्ही संदेश पाठविला तरच तुमच्या इमेल आयडीची नोंद केली जाईल.  तुम्ही दिलेल्या कारणाकरिताच त्याचा उपयोग केला जाईल आणि कोणत्याही पत्रव्यवहार यादीमध्ये त्याची नोंद करण्यात येणार नाही. तुमचा इमेल आय डी इतर कोणात्याही कारणासाठी वापरला जाणार नाही आणि तुमच्या संमती शिवाय कोणालाही दिला जाणार नाही.

समजा जर तुम्हाला इतर कोणती वैयक्तिक माहिती विचारण्यात आली तर तुम्हाला ती कशी उपयोगत येईल हे कळविले जाईल. समजा कधी तुमचा असा विश्र्वास झाला की गोपनीये संदर्भातील तात्विक विधानांचे काटेकोर पालन झालेले नाही किंवा  तत्वांच्या बाबतीत काही प्रतिक्रिया असल्यास कृपया आम्हाला संपर्क करणे या पृष्ठावर सूचित करावे.

या गोपनीयतेच्या विधांनामधील “वैयक्तिक माहिती” या संज्ञेचा अर्थ अशी कोणोतीही माहिती ज्यामुळे तुमची ओळख सिध्द होते किंवा संदर्भित होते.