० ते ६ वर्षांमधील अति तीव्र कुपोषित सॅम (SAM) प्रभावित बालके
कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी राज्यात ‘ग्राम बाल विकास केंद्रे’ स्थापन केलेली आहेत. या बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर देण्यात येतो.
अंगणवाडीत ० ते ६ वयोगटांतील सर्व बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषावर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश देण्यात येतो. प्रत्येक तीव्र कुपोषित बालक सर्वसाधारण पोषण श्रेणीत आणण्यांसाठी ग्राम बाल विकास केंद्रात सर्वकष प्रयत्न केले जातात.
अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका ६ महिन्यापासून ६ वर्षापर्यंतच्या बालकांची उंची आणि वजन घेऊन SAM बालकांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे बालक SAM श्रेणीतील (category) आहे किंवा नाही याबाबत तपासणी करून खात्री करतात आणी ग्राम बाल विकास केंद्रात (VCDS) दाखल करण्याची गरज असल्यास SAM बालकाला ग्राम बाल विकास केंद्रात (VCDC) दाखल करण्यात येते.