परिचय
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना , ही एक थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना आहे, जी राज्यातील पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० प्रदान करते. या उपक्रमाचा उद्देश थेट आर्थिक मदतीद्वारे महिलांचे आरोग्य आणि कल्याण वाढवणे आहे.
लाभार्थी
२८ जून २०२४ रोजी सुरू झालेल्या या योजनेचा महाराष्ट्रातील अंदाजे २.६१ कोटी महिलांना फायदा होईल असा अंदाज आहे. ही योजना २१ ते ६५ वर्षे वयोगटातील आणि ₹२.५ लाखांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या राज्यातील महिलांकरिता सुरु करण्यात आलेली आहे.
उद्धेश
या उपक्रमाचा उद्देश थेट आर्थिक मदतीद्वारे महिलांचे आरोग्य आणि कल्याण वाढवणे आहे.
योजना तपशील
आतापर्यंत या योजनेअंतर्गत अंदाजे २.६३ कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत. आजपर्यंत, अंदाजे २.४८ कोटी लाभार्थ्यांना विक्रमी वेळेत या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळाली आहे. अल्पावधीतच, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेला व्यापक लोकप्रियता मिळाली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांचे जीवन बदलले आहे.
संकेतस्तळं: https://ladakibahin.maharashtra.gov.in/