पार्श्वभूमी

महिला व बाल विकास विभाग महिलांच्या विरोधातील गुन्हे कमी करणे, कौशल्य विकसनामधून महिलांचे सक्षमीकरण करणे, मुलांमधील कुपोषण कमी करणे आणि स्त्री-भृण हत्या कमी करणे इत्यादी बाबत प्रयत्नशील असून राज्यातील महिलांच्या आणि मुलांच्या उन्नतीकरिता केंद्रित आहे.

विभागाचा ठाम विश्र्वास आहे की त्याची महत्वाची उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी, कॉर्पोरेट जगताचा सहयोग अगदी महत्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतो.  त्यासाठीच विभागाने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सी एस आर) करिता धोरण केले आहे आहे, जे कॉर्पोरेट ना त्यांच्या सी एस आर शी संबंधित कार्यात मदत करते आणि तसेच एकंदरीत विभागाची महत्वाची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांचे योगदान वळविते. या बरोबरच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी मुळे त्यांच्या व्यवसायात, प्रशासनात, व्यवस्थापनात, व्यवसाय धोरण आणि दैंनदिन निर्णय तसेच कृतीमधून सामाजिक भान राखले जाईल.

कॉर्पोरेट समुदाय नाविन्यपूर्ण, वैज्ञानिक, कार्यक्षम, प्रभावी पध्दतीने विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याकरिता पुढाकार घेऊन शासनाच्या लक्ष्य लोकसंख्येच्या (जे राज्याच्या लोकसंख्येच्या ५४% पेक्षाही अधिक आहे) सर्वसमावेशक, सुरक्षित आणि निकोप वृध्दीकरिता सक्रीय सहभागी होऊ शकतात.

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी द्वारे सहयोग करू इच्छिणारे इच्छूक अर्जदार विभागाच्या सीएसआर सेलशी संपर्क करू शकतात किंवा अगदी साधा ऑनलाइन अर्ज भरून जमा करू शकतात. अर्ज प्राप्तीनंतर दोन ते तीन कामकाजाच्या दिवसांमध्ये विभागाचा सीएसआर सेल इच्छूक कॉर्पोरेट संस्थेशी संपर्क करून पुढील कार्यक्रमाच्या रुपरेषेची आखणी करतील.