सध्या सुरू असलेले CSR प्रकल्प

अनु. क्र सी एस आर सहभागी पक्ष सहयोग क्षेत्र थोडक्यात तपशील
महिला आणि बाल विकास विभाग आणि ब्रिटानिया न्युट्रिशन फाउंडेशन महाराष्ट्रातील मेळघाट क्षेत्रातील बालकांचे कुपोषण कमी करण्याच्या उपक्रमांमध्ये सहयोग
 • महिला आणि बाल विकास विभागाने अमरावती जिल्हा, मेळघाट क्षेत्रातील बालकांमधील कुपोषणाची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने केंद्रित प्रयत्न करण्यासाठी ब्रिटानिया न्युट्रिशन फाउंडेशन सोबत सामजंस्य करार केला आहे
 • या क्षेत्रात प्रामुख्याने आदिवासी लोकांची संख्या अधिक असून यामध्ये धारणी आणि चिखलदरा या ठिकाणच्या दोन एकात्मिक बाल विकास सेवा (आय सी डी एस) प्रकल्पांचा समावेश आहे.
 • या प्रकल्पाची अमंलबजावणी मेळघाट क्षेत्रातील ५ वर्षे वयाखालील प्रत्येक बालकाचे वास्तविक आरोग्य देखभाल आणि पोषण स्थिती जीपीएस आणि आयव्हिआरएस प्रणाली आधारीत “जातक” ॲपिल्केशन द्वारे केली जाते.
 • अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दर महिन्याला वय वर्षे ५ खालील मुलांच्या वजनचा दिलेला अहवाल वापरून, सॉफ्टवेअर ५ वर्षा खालील अती कमी वजन (एस यु डब्ल्यू) श्रेणीतील आणि ३ महिन्यांच्या कालावधीत ज्यांची वजन वाढ स्थिर आहे किवा कमी होत आहे, यांची यादी तयार करून देते.
 • या उपक्रमाचे उद्दिष्ट हे आहे की वय वर्षे ५ खालील मुलांमधील विशेषत: श्रेणी ३ मधील कमी वजनाच्या पातळीतील मुलांची संख्या कमी करणे.
महिला आणि बाल विकास विभाग, राजमाता जिजाऊ माता-बाल मिशन आणि रिलायन्स फाउंडेशन कुपोषण कमी करून महिला आणि बालकांच्या पोषणाची व आरोग्याच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट राज्यात परसबाग विकसनाचे काम करण्यासाठी सहयोग करणे. 
 • सुरुवातीला, परसबाग विकसनाचे काम पुणे, ठाणे, पालघर, यवतमाळ, परभणी आणि नाशिक या सहा जिल्ह्यामध्ये सुरु करण्यात येईल.
 • प्रथम चरणात या ६ जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉकमधील एका अंगणवाडीमध्ये नमुना म्हणून प्रत्यक्ष परसबाग विकसन करून दाखविण्यात येईल.
 • अंगणवाड्यांसोबतच शक्य झाल्यास गावामधील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सहयोगिनी गृह यामध्ये देखील परसबाग सुविधा उपलब्ध करण्यात येईल.
 • महिला आणि बाल विकास विभाग, राजमाता जिजाऊ माता-बाल  आरोग्य आणि पोषण मिशन मिळून पोषणाबाबत जाणीव जागृती करणे, अंगणवाड्यांची निवड करणे, प्रशिक्षणार्थीं जमविणे, प्रशिक्षणा करिता पायभूत सुविधा पुरविणे आणि अशीच इतर कार्येही करणे.
 • रिलायन्स फाउंडेशनचा संघ मार्गदर्शन/कार्यशाळा, प्रशिक्षण आणि परसबाग स्थापन करण्याच्या प्रात्यक्षिकात मदत करण्याचे काम करतो.   अखेरीस प्रत्यक्ष परसबाग तयार करण्याचे प्रात्यक्षिक ब्लॉककमधील इतर अंगणवाड्यांचे प्रशिक्षणच ठरते. 
महिला आणि बाल विकास विभाग आणि आयकेअर लाईफ कौशल्य विकास, उद्योजकता विकास आणि महाराष्ट्रातील महिला सबलीकरण
 • या सामाजंस्य कराराचा उद्देश असा आहे की औद्योगिक क्षेत्रातून सी एस आर स्वरुपात मिळणाऱ्या योगदानाचा महाराष्टातील महिलांनां रोजगार मिळण्यासाठी, त्यांना कौशल्ये प्रदान करण्यासाठी आणि त्यांची क्षमता वृध्दीगंत करण्यासाठी उपयोग करुन घेणे.
 • ज्या ठिकाणी महिलांना आर्थिक संधी अगदी मर्यादित असतात असा इतिहास आहे अशा ठिकाणच्या महिलांना अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत तसेच तेथे महिलांमधून आदर्श व्यक्तित्व आणि मार्गदर्शक तयार करणे हा देखील या उपक्रमाचा उद्देश आहे.
 • हा उपक्रम अधिक निकोप, जास्त कमावित्या आणि घरात स्वत:च्या निर्णयक्षमतेचा उपयोग करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांची शक्ती निर्माण करण्याच्या दिशेने कार्यरत आहे. या महिला त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची खातरजमा करतील जेणे करून गरिबी आणि उपासमारीचे दुष्टचक्र भेदता येईल.
 • आता पर्यंत या उपक्रमांतर्गत एकूण २०० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महिला आणि बाल विकास विभाग आणि रिध्दी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील (भिवंडी II) येथील एका आय एस डी एस प्रकल्पातील ५ वर्षे वयाखालील मुलांची स्थिती जाणून घेणे जेणे करून आय सी डी एस च्या यंत्रणॆला या मुलांच्या पोषणाची स्थिती सुधारण्यासाठी काम सुरु करता येईल.
 •  या उपक्रमाचा मुख्य उद्देश ठाणे जिल्ह्यातील भिवंडी प्रकल्प II  मधील मुलांचे  ’जातक ॲप्लिकेशन’ वापरून वास्तविक स्थिती जाणून घेणे आणि या मुलांच्या पोषणाची स्थिती सुधारण्याकरिता आवश्यक ती पावले उचलणे.
 • जातक ॲप्लिकेशन जी पी एस, इंटरॲक्टीव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टीम (आय व्ही आर एस) आणि मोबाईल/सर्व्हर आधारित सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन यांचा एकत्रित उपयोग करते.
महिला आणि बाल विकास विभाग, मे. दिवाण हौसिंग फायनान्स कोर्पोरेशन लि. आणि मे. संहिता सोशल वेन्चर्स प्रा. लि. वसई आणि पालघर तालुका, जिल्हा पालघर, महाराष्ट येथील ९९० पेक्षाही अधिक अंगणवाड्यांचे सक्षमीकरण
 • औद्योगिक भागीदार वसई आणि पालघर तालुक्यातील अंगणवाड्यांचे आधारभूत अभ्यासावर परिस्थितीजन्य विश्लेषण  करून  निवडक अंगणवाड्यांकरिता त्यांच्या गरजा आणि आवश्यकतेनुसार सम्रगपणे कार्यक्रमाची आखणी करतील.
 • ते सीडीपीओ (बाल विकास प्रकल्प अधिकारी), पर्यवेक्षक, अंगणवाडी कर्मचारी आणि सेविका यांना अनुकूल प्रशिक्षण आणि ’आदर्श अंगणवाडी’ केंद्राना भेटी देऊन त्यांच्या क्षमतेचे सर्वधंन करून ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना देण्यात येणाऱ्या शाला-पूर्व शिक्षणात सुधारणा घडवून आणण्यासाठी सुध्दा कार्यरत राहणार आहेत.
 • या उपक्रमाचा भाग म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येते जेणे करून ते शिकलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करू शकतील.
 • औद्योगिक भागीदार, महिला आणि बाल विकास विभागाचे प्रयत्न अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने एक सर्वसमावेशक कार्यक्रमाची आखणी देखील करतील. त्याच बरोबर पिण्यायोग्य पाण्याची सोय आणि स्वच्छतेच्या इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही करतील.
महिला आणि बाल विकास विभाग, चिल्ड्रेन्स एड सोसायटी(मुंबई) आणि जे एस डब्ल्यु फाउंडेशन डोंगरी निरिक्षण गृहातील निवासी मुलांना गुणावत्तापूर्ण सेवा पुरविणे, प्रभावी देखरेख करणे आणि संस्थात्मक बांधणी मजबूत करणे यांचाही यात समावेश आहे.
 • निरिक्षण गृहातील वाचनालयासाठी पायाभूत सुविधा सारख्या विविध क्षेत्रात अगदी जवळून काम करणे.
 • मुलांना निरिक्षण गृहाच्या परिसरात परसबाग फुलविण्याचे कौशल्य विकास/ व्यावसायिक प्रशिक्षण देणे जेणे करून त्यांना सुक्ष्म अन्न द्रव्यांनी परिपूर्ण आहार उपलब्ध होईल.
 • मुलांसाठी नियमितपणे डोळे तपासणी शिबीरांचे आयोजन करणे, खेळाच्या मैदानातील मातीच्या थराचे सपाटीकरण करणे म्हणजे मुलांना सुरक्षितपणे मैदानी खेळ खेळणे शक्य होईल.
 • मॅजिक बस मार्फत क्रीडा उपक्रमांचे आयोजन करणे आणि शक्य असल्यास तिन महिन्यातून किमान एकदा मुलांना औद्योगिक वसाहतीमध्ये घेऊन जाणे, शक्य असल्यास त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाचे महत्व समजावून सांगणे.
 • स्वच्छता आणि सौदर्यीकरणाकरिता परिसराच्या भिंती रंगविणे.
महिला आणि बाल विकास विभाग, जमशेदजी टाटा ट्रस्ट आणि युनिसेफ तीव्र कुपोषण समुदाय व्यवस्थापन
 • विभागाने जमशेदजी टाटा ट्रस्ट आणि युनिसेफ सोबत नंदुरबार जिल्ह्यातील तीव्र कुपोषण समुदाय व्यवस्थापन (“सी एम ए ए प्रकल्प”) प्रकल्पाच्या अंमलबजावणी करिता सामंजस्य करार केला आहे.
 • नंदुरबार जिल्ह्यातील सहा ब्लॉकमधील अंदाजे ११५०० तीव्र कुपोषित मुलांच्या (एस ए एम)  जिविनमान आणि विकासाच्या परिणामात सुधारणा करणे तसेच पोषणाच्या तिन पध्दती, एम एन टी/ आर यु टी एफ, एस एफ आणि ए आर एफ पाककृतीच्या परिणामांची तुलना हा या उपक्रमाचा उद्देशचा आहे.
महिला आणि बाल विकास विभाग, बृहन्मुंबई महानगर पालिका (एम सी गी एम) आणि सोसायटी फॉर न्युट्रिशन, एज्युकेशन आणि हेल्थ ॲक्शन (एस एन ई एच ए) मुंबईच्या अनौपचारीक वस्त्यांमधील महिला आणि बालकांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे.
 •  महिला आणि बाल विकास विभाग, बृ.मु.म.न.पा. आणि एस एन ई एच ए यांनी एकत्रितरित्या मुंबई बाल आरोग्य आणि पोषण समिती स्थापन करण्याचा सामंजस्य करार केला असून एककेंद्रभिमुखतेने माता आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी पुढील प्रमुख उद्दिष्टे प्राप्त करण्याची निश्चिती केली आहे.
 • माता आणि बालक एककेंद्रभिमुखता वाढविणे आणि संवेदनशील क्षेत्रापर्यंत पोहचणे
 • साहित्य आणि मनुष्यबळाचा परिणामकारक आणि पूर्ण क्षमतेने उपयोग करणे.
 • आय सी डी एस आणि आरोग्य सेवांचे प्रमाण वाढविणे.
 • वेळेत आणि परिणामकारक संदर्भ आणि पाठपुरावा
 • सामुदायिक मालकी कायम ठेवणे.
.महिला आणि बाल विकास विभाग आणि जे एस डब्ल्यु फाउंडेशन तालुका जव्हार, जिल्हा पालघर मधील अंगणवाड्यांमधील बालकांच्या कुपोषणाची समस्या हाताळणे. (सुदृढ भारत अभियान)
 • नि:शुल्क जेवण देऊन वाढीस प्रोत्साहन देणे
 • पाणलोट क्षेत्राचा विकास आणि शेती आधारीत उत्पादकत्व वाढवून जीवन जगण्याचा आणि अन्न सुरक्षेचा प्रश्नाचे दिर्घकालीन समाधान करणे.
 • दिर्घकालीन संस्थात्मक सक्षमीकरण प्रक्रिया.
१० महिला आणि बाल विकास विभाग आणि फाईट हंगर फाऊंडेशन  पालघर जिल्ह्यातील मोखाडा विभागात कुपोषणाची समस्या हातळण्याकरिता सहयोग करणे.
: या सहयोगाचा भाग म्हणून करण्यात येणारे काही प्रमुख उपक्रम खालीलप्रमाणे आहेत.
 • एकात्मिक बाल विकास योजनेच्या (आय सी डी एस) कर्मचाऱ्यांना तीव्र कुपोषणाचे समुदाय आधारीत नियोजन करण्याकरिता, अर्भक आणि बाळाचे स्तनपान इत्यादी विषयांबाबत प्रशिक्षणाकरिता प्रमाणित साहित्य/संच विकसित करणे आणि साधनं पुरविठ्यावर देखरेख करणे.
 • कुपोषणाचे व्यवस्थापनात समाजाच्या भूमिकेला आंगणवाडी सेविकांना तांत्रिक सहाय्य आणि आधार देण्याच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे.
 • वैद्यकीय गुंतागूत असलेल्या तीव्रकुपोषित मुलांना पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये पाठविण्यास मदत करणे.
११ महिला आणि बाल विकास विभाग आणि झाफ्फिरो लर्निंग प्रा.लि. राज्यातील वंचित महिलांना कौशल्य विकसन प्रशिक्षण देणे, जेणे करून  त्या ईकॉमर्स कंपन्यांचे रायडर आणि अन्न वितरण सेवामंध्ये चालक/ खाजगी वाहन चालक होऊ शकतात.
 • दरवर्षी १५००० उमेदवारांना प्रशिक्षण देणे म्हणजे पाच वर्षामध्ये ७५००० उमेदवारांना विविध कौशल्ये (चालक/ खाजगी वाहन चालक, ई कॉमर्स कंपन्यांचे रायडर आणि अन्न वितरण सेवांमध्ये) विकसित करणे जेणे करून प्रशिक्षणामुळे त्यांच्या रोजगारक्षमते मध्ये सुधारणा होईल.
 • महिला आणि बाल विकास विभागाने आणलेल्या पात्र उमेदवारांसाठी प्रशिक्षण केंद्र चालविणे आणि (वर्ग, निदर्शन प्रयोगशाळा, प्रोजेक्टर इत्यादी) सुविधा पुरविणे.

अधिक वाचा PDF File  

१२ महिला आणि बाल विकास विभाग, यूएन महिला आणि युनिसेफ लिंग अर्थसंकल्पावर सहयोग
 • महाराष्ट्र शासनातील महत्वाचे भागिदार त्यासोबतच इतर विभाग यांच्यात लिंग अर्थसंकल्पाबाबत व्यापक प्रमाणात जाणीव जागृती करण्याची खातर जमा करणे
 • राज्यामध्ये लिंग अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्याकरिता मजबूत कृती आराखडा विकसित करणे.
 • लिंग अर्थसंकल्पाच्या विविध पैलूवर शासकीय अधिकाऱ्यांची क्षमता संवर्धनाच्या योजना विकसित करणे.